Description
इतकी औषधे आपण घेतो पण औषधांबद्दल आपल्याला फारच थोडी माहिती असते. कोणतेही औषध हा एक आपल्या शरीराचा परकीय असा एक रेणू अथवा रेणूंचा समूदाय असतो. या रेणूचे शरीरावर आणि आजारावर नेमके काय परिणाम होतात हे जाणणे महत्त्वाचे असते. हे औषध कसे घेतले गेले त्यात कोणते रासायनिक रेणू आहेत? यांचा आपल्या शरीरावर लगेच आणि कालांतराने काय परिणाम होतो? त्यातले काही परिणाम घातक असू शकतील का? औषधांच्या किंमती कशा ठरतात? औषधे जेवणापूर्वी घ्यावीत का भरल्या पोटी सेवावीत? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला डॉ. महाडीक यांनी या पुस्तकांत दिली आहेत.