Description
प्रत्येक सजीव, माणूस असो वा प्राणी, तो प्रेमाचा भुकेला असतो; हे चिरंतन सत्य ‘कांडा’ या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे. सुनिताराजे पवार यांनी या लेखनातून जाता जाता अजूनही काही जीवनमूल्यं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आफ्रिकेच्या जंगलात सुरू झालेली कथा त्रावणकोर येथील सुवर्णमंदिराजवळ येऊन काही काळ थांबते. या प्रवासात वाचक कधी अरण्याची माहिती घेत, तर कधी चालीरिती समजावून घेत, दोन मित्रांच्या भावुक सहवासात आपसूक गुरफटला जातो.
दोन पिलं, पैकी एक माणसाचं आणि दुसरं हत्तीचं पिल्लू म्हणजे ‘कांडा’ आणि मुलाचं नाव कृष्णा. दोघंही आईला दुरावलेली ताटातूट झालेली. प्रेमाला आसुसलेली. या दोघांच्या हळूवार जगातली खळबळ वाचताना डोळे पाणावतात. दोन जिवांचा शब्दविरहित भावकल्लोळ, स्पर्श आणि आसवांच्या बोलीतून जुळलेलं नातं, शब्दात पकडणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. मात्र, लेखिका त्यात अगदी सहजपणानं यशस्वी झालेली दिसते.