Description
माझं मोठेपण थोडंच माझ्या आमदार खासदारकीत गुरफटलेलं होतं? विधिमंडळानं न् संसद-भवनानं का माझ्या मनाचा पिंड पोसलेला होता. तेव्हा मी त्या अब्दागिरीखालून बाजूला व्हायचं नव्हतं? मान-सन्मानाबद्दलच्या माझ्या कल्पनाच अगदी वेगळ्या आहेत, त्याला मी तरी काय करू? आपखुशीनं पत्करलेल्या न् परिस्थितीनं अंगावर टाकलेल्या कामाला पेलीत मी आपल्यातच एवढी रंगलेली असते, की काय सांगावं? असं असूनही जनमानसात माझ्या एकीचं अगत्य आहे ना? मग असू देत ना मला आणि तशीच आमदार खासदारकीच्या वर्तुळाबाहेर! मनमुरादपणानं करू दे ना माझं मला काम? माझ्या पत्करल्या कामातली जिद्द न् मला त्यामुळं मिळालेला मानसन्मान एवढा जबरदस्त आहे की, त्याची सर कशाला येऊच नये!