Description
कबीर मानतवतावादी, प्रतिभावंत, अलौकिक, ज्ञानी सत्पुरुष होते. त्यांनी कोणत्याही जातीधर्माचा, पंथाचा पुरस्कार केला नाही. 'माणूस' हा त्यांच्या विचारात, विवेकात केंद्रस्थानी राहिला. मानवकल्याणासाठी समाजातील वाईट प्रथांवर ते प्रहार करीत राहिले.
ईश्वर हा निर्गुण, निराकार, निर्मळ, निर्लेप, निरंतर आहे. तो गुणरहित, अनादि, अमर्याद, सर्वव्यापी आहे. त्याला कुठल्याच संकल्पनेत बांधू नका. हा संदेश कबीरांनी दिला.
सामाजिक प्रबोधन हे त्यांचे ध्येय होते. सामाजिक, धार्मिक व्यंगावर ते बोट ठेवत. मनुष्यच वाणीतून व्यक्त होऊ शकतो. 'वाणी' हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा उपयोग चांगला केला पाहिजे. असा संदेश ते देत राहिले. समाजातील अंधश्रद्धांवर त्यांनी कडाडून प्रहार केले. कबीरांचे दोहे म्हणजे जीवन यशस्वी करण्याचे मंत्र आहेत.
-
सुनिताराजे पवार
- प्रमुख कार्यवाह,
- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे