Description
वारकरी संतांचे जीवनचरित्र 'कादंबरी' या साहित्य प्रकारातून कादंबरीकारांनी अतीव आदर व श्रद्धेतून सुलभतेने चित्रित केले आहे. प्राचीन काळापासून समृद्धपणे बहरत असलेल्या संत चरित्रांमधून कादंबरीकारांना प्रेरणा मिळाली आहे. प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्यावर अधिक संख्येने कादंबरी लेखन झाले आहे. 'मुंगी उडाली आकाशी', 'इंद्रायणी काठी', 'मोगरा फुलला', 'नामाचा गजर', 'एका जनार्दनी', 'आनंदओवरी', 'तुका आकाशाएवढा', 'महाद्वार', 'मुक्ताई' इ. कादंबऱ्यांनी वाचकांना प्रभावित केले आहे. मानवतावादी, विशाल अंतःकरणाचे वारकरी संत कादंबरीकारांनी कौशल्याने रेखाटले आहेत.
वारकरी संतांची नीतिमूल्यांची व्यापक शिकवण कादंबरीकारांनी ओघवत्या शैलीत विशद केली आहे व माझ्या दृष्टीने हेच या कादंबऱ्यांचे बलस्थान आहे. वारकरी संत चरित्रात्मक कादंबऱ्यांचा आस्वाद प्रस्तुत ग्रंथातून वाचकांना घेता येईल. वारकरी साहित्याचा कथनशैलीच्या परिप्रेक्षातून अभ्यास होण्याची शक्यता सदर ग्रंथातून निर्माण झाली आहे. वारकरी साहित्याच्या अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.