Description
‘वारणेचा वाघ’ या त्यांच्या कादंबरीतला प्रसंग,
“धावत्या घोड्याचा लगाम काढणं हे बेशिस्तपणाचं आहे. आणि ते बेशिस्त वर्तन फक्त लुटारूच करू शकतात. तुम्ही मराठी माणसं लुटारू शिस्तीनेच दुसर्यावर मात करू पाहता. रॉबर्टच्या या बोलण्याचा सत्तूला राग आला. तो रॉबर्टला बाणेदारपणे म्हणाला, “सवाल माझ्या एकट्याचा आहे, सर्व मराठी माणसांचा नाही. मराठी माणूस लुटारू नसतो तर लुटारूंचा फडशा पाडतो, त्यांना नेस्तनाबूूत करतो. या देशात मराठ्यांनी राज्य केलं. त्यांची स्वतंत्र रणनिती होती. तो माझा इतिहास मला ठाऊक आहे. लुटारू कोण ते इतिहास ठरवणार आहे, तोच सांगणार आहे. पण त्यावेळी मी बेशिस्त आणि तुम्ही शिस्तवाले आपण दोघेही कुठं असू कुणीच सांगू शकणार नाही.” सत्तू भोसले नि रॉबर्ट यांच्या शाब्दिक चकमकीतला हा क्रांतिकारी विचार नव्हे का? तेच सारे विचार लेखकाने यात मांडत अण्णांचं चरित्र ठसठशीत करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं.