Skip to product information
1 of 1

Sahityakrutiche Madhyamantar साहित्यकृतीचे माध्यमांतर By Dr. rajendra Thorat, Aashutosh kasabekar

Sahityakrutiche Madhyamantar साहित्यकृतीचे माध्यमांतर By Dr. rajendra Thorat, Aashutosh kasabekar

Regular price Rs. 259.00
Sale price Rs. 259.00 Regular price Rs. 300.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Type

Books

Estimated deliver 5-7 days

People are viewing this right now

View full details
साहित्याची निर्मिती प्राचीन काळापासून होत असून सिनेमा हे अलीकडचे पण प्रभावी माध्यम आहे. कादंबरी व सिनेमा हे फूल व मध याप्रमाणे आहे. सिनेमा हा अनेक कलांचा गुच्छ आहे. साहित्यातील सर्व अंगे, वाद्यवृंदासह विविध कलांचा एकत्रित मिलाफ सिनेमात केला जात असल्यामुळे सिनेमाला सर्व कलांचा गुच्छ म्हणतात. साहित्याचे वाचन व्यक्तिगत पातळीवर करता येते. सिनेमा मात्र समूहासाठी असतो. दिग्दर्शकाने तयार केलेला सिनेमा रसिकांच्या आस्वादासाठी असतो. म्हणजे ताट तुमच्यासमोर आहे त्याचा आस्वाद घ्या.
साहित्यकृतीच्या माध्यमांतराचा विविधांगी परिप्रेक्षातून अभ्यास होणे आवश्यक आहे. माध्यमांतर म्हणजे हुबेहूब नक्कल नाही. साहित्यकृतीवर सिनेमा करणे अवघड आहे. कोसलावर सिनेमा करायचा म्हटला तर माझ्यासाठी अवघड आहे. फक्त कादंबरी चांगली असून चालत नाही तर त्यावर मी तयार केलेला सिनेमा चांगला पाहिजे.
साहित्यकृतीच्या माध्यमांतरामध्ये कथेचा महत्त्वाचा वाटा आहे. आशयघन साहित्यकृतींनी जागतिक सिनेमांचा परीघ रूंदावला आहे. माझ्या 'फॅन्ड्री' व 'सैराट' या सिनेमातील कथेमधून मला माझे अनुभवविश्व प्रदर्शित करायचे होते. फॅन्ड्रीमधून मला अभिव्यक्ती मांडायची होती. माझ्या खिशात एक दगड होता. हा दगड घेऊन मी फिरत होतो व योग्य वेळी प्रस्थापित व्यवस्थेवर मला हा दगड फेकायचा होता. 'सैराट' मधून एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्यांना समाज कसा सामावून घेत नाही याचे चित्रण केले आहे.
आशय अभिव्यक्तीच्या दृष्टीने साहित्य व सिनेमा ही दोन्ही माध्यम मला जवळची आहे. साहित्यकृतीचे माध्यमांतर हे ऑजळीतून पाणी घेऊन येण्याचा प्रकार असून आशयाची गळती होऊ न देण्याची मोठी जबाबदारी दिग्दर्शकाची आहे. कादंबरी, कथा, कवितेतील आशय सिनेमात माध्यमांतरित करत असतांना खूप तयारी करावी लागते. थोडे दुर्लक्ष झाले तरी आशयात मोठा बदल होतो. त्यामुळे आशयाची गळती न होण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
साहित्यकृतीचे माध्यमांतर या पुस्तकातून साहित्याचे वाचक, अभ्यासक, संशोधक तसेच विविध माध्यमातील अभ्यासकांना 'माध्यमांतर' या संकल्पनेविषयी विविधांगी परिप्रेक्ष जाणवतील. 'साहित्यकृतीचे माध्यमांतर' या विषयावर यापुढील काळात नवदृष्टिकोनातून लेखन होण्याची शक्यता या पुस्तकाने तयार केली आहे.
Let us know abour your query!